INS Vikrant | नरेंद्र मोदींनी शिवाजी महाराजांच्या नौदलाचा उल्लेख करत घेतला मोठा निर्णय

2022-09-02 1,489

आज भारतीय नौदलाच्या ताफ्यात पहिली स्वदेशी विमानवाहू युद्धनौका 'INS विक्रांत' दाखल करण्यात आली. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नौदलाच्या नव्या ध्वजाचे देखील अनावरण केलं. आजपासून नौदलाचा नवा ध्वज फडकत राहिल आणि हा ध्वज जवानांना नवी उर्जा देईल, असे सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नौदलाचा नवा ध्वज छत्रपती शिवाजी महाराज यांना समर्पित करत असल्याचे म्हटले आहे. त्याच बरोबर शिवाजी महाराज यांनी आरमार दलाचं महत्त्व जाणलं, त्यांनी नौदलाचा विकास केला. असही मोदी म्हणाले.
#indiannavy #insvikrant #naredramodi
Please Like and Subscribe for More Videos.